नाशिक – उच्च दर्जाची रूग्णसेवा बहाल करण्याच्या उद्देशाने मुंबई नाका परिसरात अद्ययावत सुविधांनी व अनुभवी तज्ञ डॉक्टरांनी युक्त नारायणी हॉस्पिटलपासून लोकार्पित करीत असल्याची माहिती संचालक मंडळाच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. सुमारे १०० बेडचे हे हॉस्पिटल हॉटेल छानच्या मागे श्रीवल्लभ नगर परिसरात साकारण्यात आले आहे.
संचालक डॉ. पंकज राणे, डॉ. गौरी दिवाण, डॉ. देवीकुमार केळकर, डॉ. आनंद दिवाण, डॉ. स्वप्नील साखला, डॉ. मनीष चोकसी, डॉ. अजय जाधव, डॉ. दिनेश जोशी, डॉ. दीपा जोशी, डॉ. मयुरी केळकर, डॉ. प्रियंका जाधव आणि डॉ. मोनाली राणे यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सेवांची उपलब्धता राहणार असून त्यामध्ये मेडीसीन, सर्जरी, ऑर्थोपेडीक्स, ऑब्स्टेट्रिक्स, गायनॅकॉलॉजी आणि पिडीयाट्रीक्स या शाखांचा समावेश राहणार आहे. समग्र दृष्टीकोनातून आयुर्वेद व पंचकर्म यांसह नेफ्रॉलॉजी, न्युरॉलॉजी, ऑन्कॉलॉजी, चेस्ट मेडीसीन यांवरील उपचाराची सुविधा उपलब्ध करून देऊन नाशिक आणि परिसरातील रूग्णांना ‘वन स्टॉप हेल्थकेअर डेस्टिनेशन’ ची प्रचिती देण्याचा संकल्प यावेळी संचालक मंडळाकडून व्यक्त करण्यात आला.
हॉस्पिटलमधील सुविधांबाबत माहिती देताना ते म्हणाले, येथे चोवीस तास सेवा उपलब्ध असण्याशिवाय २२ बेडचा अद्ययावत आयसीयु विभाग, लॅमिनार एअरफ्लोसह अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स, कार्डिअक व डायबेटीक केअर, न्युरॉलॉजी व न्युरोसर्जरी, ऍडव्हान्स ब्रेन व स्पाईन सर्जरी, एपीलेप्सी सर्जरी, नेफ्रॉलॉजी व डायलिसीस सर्व्हिसेस, ग्रॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी, कॅन्सर सर्जरी, किमोथेरपी सह सी टी स्कॅन आणि सोनोग्राफी या सुविधांची उपलब्धता राहील.
याव्यतिरिक्त स्लीप लॅब, ब्रॉन्कोस्कोपी अँड थोरॅकोस्कोपी, जनरल अँड लॅप्रोस्कोपिक सर्जरी, मूळव्याध व इतर गुदविकार, ट्रॉमाकेअर अँड स्पोट्र्स मेडीसीन, जॉईंट रिप्लेसमेंट एण्ड ऑर्थोस्कोपी, मदर अँड चाईल्ड केअर, फिजीओथेरेपी अँड रिहॅबिलिटेशन युनिट, पॅथॉलॉजी, एक्झिक्युटीव हेल्थ चेक-अप, चोवीस तास औषधालय आदी सेवा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील.
अतिउत्तम मात्र परवडणार्या वैद्यकीय सुविधा हे नारायणी हॉस्पिटलचे खास वैशिष्ट्य राहणार असल्याचेही डॉक्टरांच्या चमूतर्फे स्पष्ट करण्यात आले. याप्रसंगी डॉ. चंद्रशेखर पेठे, डॉ. अमित कुलकर्णी, डॉ. मुकेश धांडे, डॉ. निखील भामरे, डॉ. हेमंत बोरसे, डॉ. वैभव निंभोरे, डॉ. तुषार नेमाडे, डॉ. सुरेखा नेमाडे, डॉ. राजेंद्र चौधरी, डॉ. स्वप्नाली सुळे, डॉ. विलास कुशारे, डॉ. ढोके, डॉ. राजेंद्र अकुल आदी उपस्थित होते.