नाशिक – शहर परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडी गायब झाली असताना आता अचानक पावसाचे आगमन झाले आहे. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. प्रारंभी हलक्या सरी कोसळल्या. त्यानंतर पावसाने जोर पकडला. जुपारी ३ वाजेपर्यंत पावसाच्या सरी कोसळत होत्या. या पावसामुळे शहरातील सर्वच रस्त्यांवर पाणी आहे. सकाळी सूर्यनारायणाने दर्शन काही वेळच झाले. त्यानंतर ढगाळ हवामान होते.
दरम्यान, बदलत्या या हवामानामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची चिन्हे असून योग्य ती खबरदारी घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.