नाशिक – शहर परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून एकूण बाधितांची संख्या ३३ हजारांच्या पुढे गेली आहे. तर आतापर्यंत ५७६ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात ९०० पेक्षा अधिक नवे बाधित समोर येत आहेत. शहरातील कोरोनाच्या प्रादुर्भावाला प्रामुख्याने नऊ ठिकाणे कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.
शहरातील जेलरोड, जय भवानी रोड, सिन्नर फाटा, हिरावाडी, पेठ रोड, म्हसरूळ, इंदिरानगर, राणेनगर आणि पाथर्डी फाटा ही नऊ ठिकाणे मोठी हॉॉस्पॉट बनली आहेत. याठिकाणी कोरोना बाधितांची संख्या लक्षणीय आहे. तसेच, दिवसेंदिवस येथील संख्या वाढतेच आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या ९ ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. शहरात सध्या एकूण १८७३ प्रतिबंधित क्षेत्र आहेत. या ९ ठिकाणांमधील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या सर्वाधिक आहे.
शहरात यापूर्वी झोपडपट्टी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक होता. त्यामुळेच महापालिकेने वडाळागाव, फुले नगर, राम नगर या भागांवर लक्ष केंद्रित केले होते. तेथील रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानंतर आता या नऊ ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळणे, मास्क न वापरणे याबाबी प्रामुख्याने कारणीभूत असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. या नऊ हॉटस्पॉटमध्ये नवे बाधित शोधणे, अँटिजेन तपासणी करणे आदी कार्यक्रम महापालिकेने हाती घेतले आहेत.
S
Pramod Yashwant Randive talathi Dasak