नाशिक – राज्यातील असंख्य मान्यवरांनी आज नाशिकमधील एका शाही विवाह स्वागत समारंभाला हजेरी लावली. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांचा त्यात समावेश आहे. हा स्वागत समारंभ मुंबई-आग्रा हायवेवरील हॉटेल ताजमध्ये संपन्न झाला.
सुरगाणा संस्थानचे धैर्यशील राजे पवार यांचे नातू, खासदार उदयनराजे भोसले यांचे मामे भाऊ व नितरंजन राजे पवार यांचे चिरंजीव अतिष राजे आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका अमिषा पटेल यांची चुलत बहीण व मुंबई स्थित व्यावसायिक सुनील पटेल यांची कन्या अनुशीराजे पटेल यांचा विवाह स्वागत समारंभ शनिवारी झाला.
याप्रसंगी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, रत्नशील राजे पवार, माजी मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल, आमदार सीमा हिरे, राहुल ढिकले, आयपीएस अधिकारी रवींद्रकुमार सिंघल, प्रधान सचिव विनिता सिंघल, खासदार हेमंत गोडसे, मनसे नेते अविनाश अभ्यंकर, माजी मंत्री शोभा बच्छाव, माजी खासदार देवीदास पिंगळे, हरिश्चंद्र चव्हाण, समीर भुजबळ, भाजप नेते सुरेश बाबा पाटील, सुहास फरांदे, मनपा विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते, दिनकर आढाव, उद्योगपती श्रीरंग सारडा, काँग्रेस प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील आदींनी यावेळी हजेरी लावली.