गळफास घेवून तिघांच्या आत्महत्या
नाशिक : गळफास घेवून शहरातील तिघांनी जीवन संपवले. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनांची कारणे समजू शकली नाहीत. पहिल्या घटनेत फुलेनगर येथील विष्णू किसन पवार (३५) यांनी शनिवारी (दि. २०) रात्री आठच्या सुमारास राहत्या घराच्या छताला दोरीच्या सहायाने गळफास घेतला. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिका-यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दुसरी घटना
दुस-या घटनेत सिन्नर फाटा, सामनगाव रोड येथील प्रशांत मधुकर औटे (२२) याने रविवारी (दि. २१) सकाळी दहाच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतला. त्यास उपचारासाठी बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. घटनेचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तिसरी घटना
तिस-या घटना सातपुर परिसरातील कार्बन नाका येथे घडली. किरण शिवाजी पंडित (२०) याने रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास राहत्या घरी सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. याप्रकरणी सातपुर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून हवालदार सुर्यवंशी तपास करत आहे.
———
मोटरसायकल चोरी
नाशिक : राहत्या घराच्या पार्किंगमधून मोटरसायकल चोरीला गेल्याप्रकरणी अमरनाथ राम अवतार सिंग (रा. उपनगर) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. १७ मार्च रोजी सिंग यांनी त्यांची मोटरसायकल क्र. (एमएच १५ एफवाय ८०३१) घरासमोर पार्क केली होती. यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांची २५ हजार रुपये किंमतीची मोटरसायकल चोरून नेली.
———