नाशिक – ज्येष्ठ कलावंत मानधन निवड समितीच्या अध्यक्षपदी संगीतकार संजय गीते यांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वयोवृद्ध तसेच जेष्ठ कलावंत यांना शासनाच्या वतीने मानधन देण्यात येते. या मानधनासाठी योग्य त्या जेष्ठ कलावंताची निवड करण्याचे काम ही समिती करत असते. या समिती सदस्य म्हणून रंगकर्मी सुनील ढगे, अभिनेते सचिन शिंदें, कलादिग्दर्शक श्याम लोंढे ,हभप निवृत्ती चव्हाण ,ऍड शशिकांत पवार,कलावंत नंदा पुणेकर-गोरे आणि सयाजी पगार यांना संधी देण्यात आली आहे. ही समिती जेष्ठ कलाकारांचे थकीत मानधन आता नियमित मिळावे यासाठी प्रयत्न करेल. या निवडीचे विविध कलासंस्थाद्वारे अभिनंदन करण्यात येत आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या समितीच्या सदस्यांची शिफारस केली होती. या समितीच्या सदस्यांची शिफारस पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली.