कोरोना पॉझिटीव्ह अपडेट्स सकाळी ११ पर्यंत
नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख २२ हजार ८४९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ७ हजार २१७ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार १६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १७२, चांदवड ५४, सिन्नर १०४, दिंडोरी ४५, निफाड २३०, देवळा ३२ नांदगांव १९३, येवला ८९, त्र्यंबकेश्वर ४२, सुरगाणा ०८, पेठ ०२, कळवण २३, बागलाण ६८, इगतपुरी ३०, मालेगांव ग्रामीण ४६ असे एकूण १ हजार १३८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ५ हजार ४९२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ५३० तर जिल्ह्याबाहेरील ५७ असे एकूण ७ हजार २१७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख ३२ हजार २३४ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९४. ७५ टक्के, नाशिक शहरात ९२.४३ टक्के, मालेगाव मध्ये ८७.९८ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९१.२२ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९२.९० इतके आहे.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण ८६६ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ६१, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १८१ व जिल्हा बाहेरील ६० अशा एकूण २ हजार १६८ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय :
– १ लाख ३२ हजार २३४ कोरोनाबाधित रुग्णांपैकी १ लाख २२ हजार ८४९ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९२.९०टक्के
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)