नाशिक – राष्ट्रवादी महिला काँग्रेस नासिक शहराध्यक्षा अनिता भामरे यांच्या नेतृत्वाखाली नायलॉन मांजा वर शहरात कायमस्वरूपी बंदी घालावी या मागणीचे निवेदन पोलिस आयुक्त दीपक कुमार पांडेय यांना देण्यात आले.
सोमवारी दिनांक २८ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास कामावरून घरी परततांना व्दारका उड्डाण पूलावरून पंचवटीत आपल्या घरी हिरावाडी येथे जातांना नायलाॅनचा मांजा गळ्या भोवती अडकल्याने भारती मारूती जाधव वय ४६ या महिलेचा दुर्दैवी मृत्यु झाला. अतिशय मन सुन्न करणारी घटना घडली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे भारतीला एक सहा वर्षाचा मुलगा आणि आई अशी कौटुंबिक जबाबदारी होती. भारतीच्या मृत्यु मुळे कुटुंब उघड्यावर पडले.
राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराध्यक्षा अनिता भामरे यांनी आज पोलिस आयुक्त दीपक कुमार पांडेय यांची भेट घेऊन शहरात यापुढे नायलॉन मांजा वर कायमस्वरूपी बंदी घालावी अशी मागणी केली. नव वर्षात मकर संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पतंग प्रेमी आकाशात पतंग उडवतात. एकमेकांच्या पतंग कापण्या साठी नायलॉन मांजाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. चार दिवसांपूर्वी स्व भारती बाबत जशी घटना घडली तशी पुन्हा घडू नये यासाठी शहरातील पतंग दुकांनाची तपासणी करून अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी.
पोलिस आयुक्त दीपक कुमार पांडेय यांना निवेदन देतांना शहराध्यक्षा अनिता भामरे, संगिता गांगुर्डे, योगिता आहेर, वैशाली ठाकरे आदि महिला उपस्थित होत्या.