नाशिक – नामको हाॅस्पिटल मध्ये तीन दिवसांपासून कोविड लसीरण सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. सदर लस जेष्ठ नागरिक वय वर्ष 60 व त्या पेक्षा अधिक तसेच 45 ते 59 वयाचे नागरिक ज्यांना ब्लड प्रेशर डायबेटीस इ. आजार आहेत; (प्रमाणपत्र आवश्यक) अशा व्यक्ती घेऊ शकतात.
लसीकरण करुन घेण्यासाठी https://selfregistration.cowin.gov.in/ या लिंक वर किंवा आरोग्य सेतू अँप वर नामको हाॅस्पिटलच्या नावावर रेजिस्ट्रेशन करावे. अगोदर रजिस्ट्रेशन केलेले नसेल तरी देखील लस दिली जाईल. पण त्यासाठी हॉस्पिटल ला आल्यावर रजिस्ट्रेशन होईपर्यंत थांबावे लागू शकते.
रजिस्ट्रेशन व लसिकरणासाठी येताना आधार कार्ड, पॅन कार्ड आणि आपला मोबाइल सोबत आणावेत या लसीचे रु. 250 प्रति डोस इतके नाममात्र सेवामुल्य केंद्र शासनाने निर्धारित केले आहे.
लसीकरणासंबंधी काही शंका, प्रश्न, अडचण असल्यास डाॅ. लक्ष्मीकांत पाठक 9422254762 यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी व ट्रस्ट मंडळाने कळविले आहे.