नाशिक – कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी नामको बँक गणेशोत्सव मंडळ व नामको बँक तर्फे बँकेच्या कर्मचाऱ्यांना वाफ घेण्यासाठी स्टीमर व आयुष काढा वितरण करण्यात आला. या प्रसंगी बँकेचे चेअरमन विजय साने, मंडळाचे अध्यक्ष व बँकेचे व्हायस चेअरमन प्रफुल्ल संचेती, हेमंत धात्रक, भानुदास चौधरी जनसंपर्क संचालक धाडीवाल, सीअो दीपक ठाकूर, प्रसाद सौंदाणे, कल्पेश पारख, मुकुंद पवार उपस्थित होते.