नाशिक – नाशिक मर्चन्ट बँकेच्या व्हाइस चेअरमनपदी हरिषभाऊ लोढा यांची निवड करण्यात आली. तर जनसंपर्क संचालकपदी रजनीताई जातेगावकर यांना संधी देण्यात आली. बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. या बैठकीत बँकेचे सर्व संचालक उपस्थितीत होते.
हरिष लोढा हे विविध सामाजित संस्थेत कार्यरत असून त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. त्यांना ही मोठी संधी बँकेने दिली आहे. तर रजनी जातेगावकर या जुन्या संचालकापैकी एक असून त्यांनाही मानाचे स्थान देण्यात आले आहे. यावेळी बँकेचे प्रमुख पदाधिकारी सोहनलाल भंडारी, माजी आमदार वसंत गिते यांच्यासह सर्व संचालक मंडळाने व पदाधिका-यांनी लोढा व जातेगावकर यांचे अभिनंदन केले आहे. या निवडीचे सुनील भटेवरा, प्रकाश बोरा, सुनील संकलेचा, डॅा. प्रफुल्ल सुराणा, गौतम चोरडीया , रवी पारख, राजू लोढा, महावीर लुणावत, प्रकाश चतुरमुथा, अनिल कर्नावट, सुनील बंब, सुभाष खिंवसरा, राजेश आहिरे, सुनील बेदमुथा, मनोज कुरेचिया, नितीन सुराणा, नवीन बंब यांनी अभिनंदन केले.