नाशिक – नाशिक मर्चटस बँकेची ६२ वी सर्वसाधारण सभा रविवार २० डिसेबर रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन आयोजित करण्यात आली होती. कोरोनामुळे दक्षता घेऊन ऑनलाईन सभा आयोजित हे स्तुत्य आहे. सभेची माहिती सभासदाना एसएमएसद्वारे दिली. लॉगइन आईडी आणि पासवर्ड सहित १७ व १९ ला पुन्हा दिले.यावरून संचालक मंडळचा प्रयत्न प्रामाणिक होता असे निदर्शनास येते. बँकेचे सभासद महाराष्ट्र व इतर राज्यात आहेत. काही सभासद ग्रामीण भागात आहेत. त्यामुळे सभेची माहिती मराठीत दिली पाहिजे हे संचालक मंडळाच्या लक्षात न आल्यामुळे सभासद सभेपासून वंचित राहिले असे वाटते. तसेच संचालक मंडळाने सभासद केंद्रस्थानी ठेऊन कारभार करावा असे सूचवावेसे वाटते अशी सुचना नामकोचे सभासद संतोष मंडलेचा यांनी केली आहे.