डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय भेटीत आयुक्त गमे यांचे निर्देश
नाशिक – डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय परिसरात रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी स्वतंत्र शेडची व्यवस्था करावी, पोलीस कर्मचारी वर्गासाठी चौकी उभारावी आणि पार्किंग मध्ये गाळ साठणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यांनी गुरुवारी रुग्णालयाला भेट दिली.
रुग्णालयातील पी.बी.एक्स.फोनची संख्या वाढवण्यात यावी. सर्व कक्षा मध्ये आवश्यक माहिती पोहचण्यासाठी साऊंड सिस्टिमचे नियोजन करावे, रुग्णालयात पुरविणेत येणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्याबाबत त्यांनी माहिती घेतली. रुग्णालयातील वैद्यकीय व इतर कर्मचाऱ्यांचा थांबण्याच्या दृष्टीने व्यवस्था करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला देण्यात आल्या. रुग्णांची दक्षता घेत असताना कर्मचाऱ्यांनी देखील स्वतःची दक्षता घेण्याच्या सूचनाही आयुक्तांनी येथील डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांना दिल्या.
कोन्सिलिंग करा
सर्व कर्मचाऱ्यांचे कौन्सिलिंग करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.रुग्णाच्या नातेवाईक यांना रुग्णाबाबत माहिती देऊन त्यांचे कौन्सिलिंग करण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. डॉ झाकीर हुसेन रुग्णालयातील डॉ. राहुल पाटील यांच्याशी मा.आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी चर्चा करून रुग्णालयात असणाऱ्या अडचणी तसेच रुग्णालयातील गंभीर रुग्णां बाबत सविस्तर चर्चा केली.रुग्णालयात रुग्णांना दिली जाणारी सुविधे बाबत माहिती डॉ.नितीन रावते यांनी दिली.
या ठिकाणी उपलब्ध औषध साठा, पी.पी.किट आदी बाबत माहिती घेऊन ज्या सेवा सुविधांची अपूर्तता आहे किंवा नव्याने आवश्यकता आहे त्याची पूर्तता करण्याच्या सूचना गमे यांनी दिल्या. येथील कार्यरत कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या. मा.आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या समवेत कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी ,कोरोना कक्ष अधिकारी डॉ.आवेश पलोड, डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयाचे प्रमुख डॉ. नितीन रावते, संध्या सावंत, स्वच्छता निरीक्षक सुनील शिरसाट आदी उपस्थित होते.