नाशिक – कोरोनाचे संकट कमी होऊन आता जनजीवन पूर्वपदावर येत आहे. वर्षाखेरीस नाताळच्या सुटीनिमित्त कलाप्रेमींसाठी वारली चित्रकार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. वारली आर्ट फाउंडेशनतर्फे दि.२५ ते ३० डिसेंबर दरम्यान प्रत्येकी दोन दिवसांच्या एकूण सहा बॅचेस होणार आहेत. त्यामध्ये ५ वर्षांपासून पुढील वयोगटातील सर्वांना सशुल्क प्रवेश मिळेल. ज्येष्ठ पत्रकार व वारली चित्रशैली अभ्यासक संजय देवधर मार्गदर्शन करणार आहेत.
सकाळी १० ते १ दरम्यान पहिली बॅच होईल. दुपारी २ ते ५ या वेळेत दुसरी बॅच असेल. बॅचनुसार दोन्ही दिवशी कार्यशाळेत सहभागी व्हायचे आहे. सर्वांना आवश्यक साहित्य, पुस्तके देण्यात येईल. प्रवेश मर्यादित असून सुरक्षितता व योग्य अंतर राखण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. येताना बरोबर पेन्सिल, जुना रुमाल,पाण्यासाठी बाउल, पॅड आणावे. मास्क बंधनकारक आहे. सर्वांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल. अधिक माहिती व
नावनोंदणीसाठी ९४२२२७२७५५ या क्रमांकावर संपर्क साधावा. संयोजकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.