नाशिक – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखेतर्फे शहरातील गरजू रंगकर्मींना मदत करण्यात आली. दवाखान्यात दाखल असलेल्या दोन कलावंतांना दहा हजार रुपये तसेच इतर कलाकारांना जीवनावश्यक वस्तूंसाठी पाच हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या पाच महिन्यात झालेल्या सभेत प्रथम दिवंगत कलाकारांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर नाट्यपरिषदेचे कार्यवाहक यांनी अभिनंदनाचा ठराव सादर केला. यात नाशिक शाखेचे सदस्य असलेल्या पंधरा गरजू रंगकर्मींना दोन हजार पाचशे रुपये आर्थिक मदत दिली होती. नाशिक शाखेतर्फे अर्ज करणाऱ्या आजारी किंवा दिवंगत रंगकर्मी सदस्यांना जास्तीत जास्त पाच हजार रुपये आर्थिक मदत करत असते. त्यानुसार दिवंगत सदस्य प्रथमेश जाधव ( बालनाट्य विभाग ) यांच्या कुटुंबियांना व सदस्य रंगकर्मी वसंत पांडे ( विजय नाट्य मंडळ ) यांना उपचारासाठी पाच हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच परिषदेचे सदस्य असलेल्या दोन रंगकर्मीना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी नाशिक शाखेचे अध्यक्ष रवींद्र कदम, कार्यवाहक सुनील ढगे, खजिनदार ईश्वर जगताप, सहकार्यवाहक राजेश भुसारे, विजय शिंगणे, राजेश जाधव, राजेंद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.









