नागपूर – नागपूर विधानभवनात विधिमंडळ सचिवालय कक्ष नागपूर ह्या महाराष्ट्राच्या उप राजधानीत व्हावे अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी विधानपरिषदेत केली होती. तिचा पाठपुरावा सुध्दा आमदार प्रकाश गजभिये यांनी केला होता. ती मागणी माननीय सभापती रामराजे नाईक निंबाळकर व सभेचे अध्यक्ष नाना पटोले व नरहरी झिरवाळ यांनी मान्य केली व ७० वर्षानंतर नागपूर येथे विधानभवनात विधिमंडळाचे सचिवालय कक्ष सुरु झाले.
विदर्भातील आमदार, खासदार व सर्वसाधरण जनतेसाठी त्यांचे प्रश्न सुचना व लक्षवेधी मांडण्याकरिता नागपूर उपराजधानी मध्ये विधानभवनात विधिमंडळाचे सचिवालय कक्ष मा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कामकाजमंत्री अनिल परब, डॉ नीलम गोऱ्हे, गृहमंत्री अनील देशमुख, पालकमंत्री नितीन राऊत, क्रीडामंत्री सुनील केदार यांचे हस्ते विधानसभेचे आजपासून सुरू करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत यांनी केले तर आभार प्रदर्शन राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले.