नांदगाव : आर्थिक व्यवहाराच्या वादातुन एका महिलेने तालुक्यातील पिंप्राळे येथे आदिवासी वस्तीवर जाऊन ऊसतोड कामगारांच्या पत्नीला अर्धनग्न करुन चप्पलने अमानुषपणे मारहाण केली. त्यानंतर पतील देखील लाकडी दांडक्याने पाठीवर वार करुन गंभीर जखमी केले. हा मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशलमीडियावर व्हायरल झाला असून पोलिस सदर महिलेचा शोध घेत आहे. या व्हिडिओमुळे जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे. मारहाण करणारी महिला मच्छी व्यवसाय करुन अवैध व्याजाचा धंदा करते. गरिब व गरुजुंना व्याजाने पैसे वाटते. पण, वसुली न झाल्याने या महिलने आदीवासी जोडप्याला पिंप्राळेगावी जाऊन जबर मारहाण केली.
https://youtu.be/QP71nIXOd78