नांदगाव – लग्नानंतर दोन दिवसांनी नवरी रोख रक्कम व सोने चांदीचे दागिने असा ३ लाख ९९ हजाराचे ऐवज घेऊन फरार झाली. २४ जून २०२० ला हे लग्न नांदगावला झाले होते. त्यानंतर २६ जूनला आई आजारी आहे असे सांगून ही नवरी फरार झाली. तीचा सहा महिने शोध घेतल्यानंतर या घटनेची फिर्याद नवरदेव निलेश दरेकर यांनी दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे.
विशेष म्हणजे नवरदेव हा पुणे येथील हवेली भागातील आहे. तर नवरी पूजा शिंदे ही राहत्याची आहे. या दोघांनी लग्न हे मधस्थांमार्फत नांदगावला केले होते. येथेच मुलांकडून मुलीला रोख रक्कम दिली गेली. पण लग्नानंतर दोन दिवसात वधू रोख रक्कम सह एकूण ३ लाख ९९ हजाराचा ऐवज घेऊन फरार झाली. लग्न नांदगावला केेले व रक्कम येथेच दिल्यामुळे ही फिर्याद नांदगावला दाखल झाली. पोलिसांनी फिर्यादीवरुन आरोपीपूजा शिंदे व मध्यस्थी करणारे बालाजी आहेर, योगेश वाघ, विजय चव्हाण, संतोष उगलमुगले यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. हे चारही जण मालेगावचे आहे. या घटनेचा तपास एपीआय पाटील करत आहे.