नांदगाव : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आज नांदगाव तालुक्याचा दौरा करत कोरोना संबंधी उपाययोजनांची नांदगाव, मनमाड, हिसवळ येथे पाहणी केली यावेळी आयसोलेशन वार्ड, ऑक्सिजन व्यवस्था त्याचबरोबर तालुकास्तरावर होणा-या लसीकरणाचा आढावा घेतला याविषयी तालुकास्तरीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांना नांदगाव तालुक्यातील कोरोना वाढीचा वेग नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्याच्या सुचना देण्यात आल्या,
हिसवळ येथील विलगीकरण केंद्रास मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी भेट देत रुग्णांशी देखील संवाद साधला, वेळोवेळी तापमान आणि ऑक्सिजन तपासला जातो का याबद्दल विचारणा करत आरोग्य यंत्रणेतर्फे करण्यात आलेल्या व्यवस्थेबद्दल समधान व्यक्त केले. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या सर्व विभागप्रमूखांना प्रत्येकी एका तालुक्याची जबाबदारी देण्यात आली असुन मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड या स्वत: सुद्धा जिल्ह्यात सर्वत्र उपस्थित राहुन पुढील काळात आढावा घेणार आहेत, नांदगाव येथील दौ-यात जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, कार्यकारी अभियंता सुनंदा नरवाडे यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.