नांदगाव- तालुका व शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गेल्या तीन दिवसापासून नांदगाव शहरात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यूला उत्तम प्रतिसाद दिला आहे.शहर परीसरात अत्यंत शुकशुकाट दिसुन येत आहे. नांदगाव नगर परीषद अधिकारी, कर्मचारी वर्ग ,तसेच नांदगाव पोलीस यंत्रणा चोख बंदोबस्तासाठी सज्ज असल्यामुळे पडले आहेत. कोणीही नागरिक रस्त्यावर दिसत नाही.
शहरात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या तसेच जिल्ह्यात नांदगाव तालुका कोरोनाचा हाँटस्पाँट ठरत असल्यामुळे नांदगाव तालुक्यातील कोरोना नियंत्रित करण्यासाठी नुकतीच आ.सुहास कांदे यांनी प्रशासनाची मिटिंग घेऊन कोरोना नियंत्रित करण्यासाठी कडक सुचना दिल्या होत्या.त्याच प्रमाणे नाशिक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपील पाटील यांनी ही नांदगाव ला भेट दिली होती. शहरात कोरोना नियंत्रणासाठी तीन दिवस शहरात जनता कर्फ्यु लागु करणे आवश्यक होते. त्यामुळे शनिवार, रविवार आणि सोमवार या तीन दिवसासाठी शहरात जनताकर्फ्यु लागु केल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रित येण्यासाठी मदत झाली आहे.
जनतेने या काळात संयम व धीर ठेवून या परिस्थिती ला सामोरे जाणे गरजेचे आहे. तरच हा महाभयंकर कोरोना आटोक्यात येईल असे प्रशासनाची भावना आहे. म्हणुन प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे.कोणीही विनाकारण फिरु नये असे प्रशासनाकडुन जनतेला आवाहन केले आहे.नगरपालिका रोज सकाळी रिक्षातून ध्वनीक्षेपाद्वारे नागरिकांना घरातच सुरक्षित राहाण्याचे आवाहन केले जात आहे. व्यावसायिकांनीही या काळात आपली दुकाने बंद ठेवावीत. तसेच नागरीकांनी घराबाहेर जातांना मास्क लावुन जावे, सँनिटायझर चा वापर करावा, व हात धुवावे तसेच वेळोवेळी प्रशासनाकडुन येणाऱ्या सुचनांचे पालन केल्यास कोरोना नक्कीच आटोक्यात येईल असे नगरपालिकेच्या अधिका-यांनी सांगितले.