नांदगाव – नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या जलवहिनीची सोमवारी रात्री काही अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली. पाणी पुरोवठा व्यवस्था विस्कळीत करणे व पाणी टंचाई होऊन गावास पाणी मिळू नये या हेतूने ही तोडफोड केल्याचे बोलले जात आहे.
उन्हाळा सुरुवात झाल्याने पाण्याची पातळी खालावत आहे. मात्र गावात पाणी टंचाई निर्माण होऊ नये या यादृष्टीने ग्रामपंचायत प्रशासन अधिक सतर्क आहे, असे असतांना कोणीतरी हा खोडसाळ प्रकार केला आहे. अशी कृतीवर ग्रामपंचायत कठोर करवाई करेल असे ग्रामसेवक भगवान जाधव यांनी सांगितले. याबाबत नांदगाव पोलीस स्थानकात गुन्हा सुद्धा नोंदवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पाण्यासाठी जनतेची वणवण होऊ नये यासाठी मागील दोन वर्षा पासून निरंतर ग्रामपंचायत कार्य करीत असल्याने पाणी टंचाई ही नाममात्र झाली आहे.पाईपलाईन तोडफोडीचे याआधी सुद्धा २ ते ३ वेळा झाले. मात्र काल फोडण्यात आलेली पाईप लाइन ही मुख्य असल्याने यामुळे पाणी साठवण होऊ शकली नाही. त्यामुळे पाणीपुरोवठा काही काळ विस्कळीत होणार असल्याची शक्यताही त्यांनी सांगितली.