नांदगाव – येथील बस स्थानकात इंधन बचत सप्ताह आणि रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमाचे उदघाटन प्रमुख पाहुणे नाशिक विभागीय लेखा परीक्षक देशमुख साहेब व प्रा.सुरेश नारायणे, आगार प्रमुख गावीत साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. प्रथम इंधन बचत अभियान आणि रस्ता सुरक्षा अभियान या फलकाचे प्रमुख अतिथींच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत पंचवीस वर्षे सुरक्षीत सेवा देणारे वाहक राजु कटारे, नन्नावरे, शेख,इप्पर आदींचा प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कोरोना काळात महामंडळाची अर्थव्यवस्था कमकुवत झाली होती.आता ती सुरळीत होत आहे. इंधनावर महामंडळाचा एकूण चाळीस टक्के खर्च होतो आहे. तो कमी कसा करता येईल यासाठी शासकांनी विचार करणे गरजेचे आहे. तसेच प्रवाशांना सुरक्षीत सेवा देण्यासाठी महामंडळाच्या कर्मचारी वर्गाने प्रयत्न करावे. पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काळ सुरक्षित सेवा देणाऱ्या सेवकांचा महामंडळाकडुन सन्मान केला जातो.असे मनोगतात देशमुख साहेब म्हणाले व नांदगाव आगाराच्या कामकाजात बाबत समाधान व्यक्त केले. जागतिक स्तरावर उर्जा निर्मिती करणाऱ्या इंधनाचा दिवसेंदिवस तुटवडा पडत आहे. शिवाय इंधनाचे दरही गीताला भिडले आहे. म्हणून इंधन बचत करण्यासाठी शासकांनी प्रयत्न करावे. नांदगाव आगाराचे कर्मचारी प्रवाशांना उत्तम सेवा देतात म्हणून नांदगाव आगाराच्या सर्वच बसेस चांगले उत्पन्न देत आहे. व प्रवाशी हे देव मानून सेवा करतात. शिवाय बस स्थानक स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा सतत प्रयत्न केला जात असल्याने नांदगाव आगार प्रवाशांच्या सेवेस तप्तर असते असे प्रतिपादन प्रा.सुरेश नारायणे यांनी मनोगतात व्यक्त केले. या वेळी आगार प्रमुखांनी नांदगाव आगार प्रवाशांच्या सेवेसाठी तप्तर असते. शिवाय इंधन बचतीसाठी वाहकांना ठराविक इंधनात बसच्या फेऱ्या निश्चित करून दिल्यामुळे मागील वर्षी इंधन बचतीचा नांदगाव आगारास सन्मानीत करण्यात आले होते ही आगाराच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही प्रवाशांना अधिक चांगली सेवा सतत देण्याचा प्रयत्न करु असे त्यांनी मनोगतात विचार व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंगाडे यांनी केले. यावेळी कुमावत साहेब, वाहतूक नियंत्रक, चालक, वाहक, अभियांत्रिकी विभागातील कर्मचारी तसेच प्रवाशी उपस्थित होते.