नांदगांव – येथील ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉक्टर रोहन बोरसे यांचा आज प्रजासत्ताक दिनी माणिकचंद कासलीवाल शिक्षण संस्थेचे वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कोविड 19 काळात बिकट परिस्थितीत देवदूत बनून गरजवंत लोकासाठी अहोरात्र सेवा देऊन असंख्य रुग्णांचे प्राण वाचविले बद्दल डॉ. बोरसे यांचा हा गौरव करण्यात आला ..संस्थेचे अध्यक्ष सुनिल कासलीवाल, सेक्रेटरी विजय चोपडा, विश्वस्त रिखब कासलीवाल, महेंद्र चांदीवाल, सुशिल कासलीवाल जुगल अग्रवाल, प्रशासन अधिकारी प्रकाश गुप्ता यांचे उपस्थितीत व हस्ते सन्मानपत्र देऊन हा गौरव करण्यात आला. प्रिन्सिपल मणी चावला, मुख्याध्यापक डफालसर, विशाल सावंत व शिक्षकवृंद यावेळी उपस्थित होते. प्रारंभी डॉ. बोरसे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमचे अध्यक्षस्थान सुनिल कासलीवाल यांनी भूषविले.