नांदगाव – नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे अंतर्गत येणाऱ्या न्यायडोंगरी उप कृषी उत्पन्न बाजार समिती मधील शेती मालाची खरेदी विक्री गेल्या वर्षभरापासून अचानक बंद करण्यात आलेली होती या बाबत न्यायडोंगरीच्या नवनिर्वाचित सरपंच सौ सुशिलाबाई रूपंचद अहिरे ,उप सरपंच ऍड अमोल आहेर व त्यांचे सर्व संचालक मंडळाने मुख्य कार्यालयाशी पत्र व्यवहार करून पाठपुरावा केल्याने याची गंभीरपणे दखल घेऊन नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तेज कवडे ,सचिव अमोल खैरनार, स्तानीक संचालक विलास आहेर यांनी तातडीने व्यापारी व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन येत्या बावीस मार्च सोमवार पासून न्यायडोंगरी उप बाजारात शेती मालाची खरेदी विक्री पुर्ववत सुरू करण्यात येणार असल्याचे अस्वासन ऍड अमोल आहेर यांना या बैठकीत देण्यात आले सदर ची माहिती बाहेर मिळताच शेतकरी व व्यापारी यांनी आनन्द व्यक्त करीत ग्रामपालिकेच्या कार्यकुशलतेचे कौतुक करून आभार मानले .
गेल्या वर्षभरापासून मार्केट बंद असल्याने गावातील व परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊन ससेहोलपट होत असे तर अधिकृत परवाने असूनही व्यापारी वर्ग हातावर हात ठेवून बसलेले होते परिणामी इतर ही छोटे मोठे व्यवसाईक हातघाईला आले होते व मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल बाहेर गावी जात असे हीच बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष घातल्याने सर्वांचीच सोय होण्याबरोबरच गावातील पैसा गावातच व्यवहाराच्या रूपाने फिरणार असल्याने सर्वानी समाधान व्यक्त केले.
२२ मार्च सोमवार पासून शेतकऱ्यांनी आपला शेती माल न्यायडोंगरी उप बाजारात विक्रीसाठी आणावा असे आवाहन ग्रामपालिका न्यायडोंगरी व कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव यांचे वतीने करण्यात आले आहे.