नांदगाव – नस्तनपूर – न्यायडोंगरी रस्त्यावरुन मेंढपाळ कुटुंब जात असतांना वेगाने येणा-या एमएच -१५ जीए – २१८१ गाडीने धडक दिल्याने एक बैल मृत्यूमुखी पडला. तर मेंढपाळ व एक बैलही जखमी झाला. सदर गाडी चाळीसगाव येथील आहे. मेंढपाळाला चाळीसगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. गाडी चालकाविरुद्ध नांदगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मेंढपाळ कुटुंबांला नुकसान भरपाई मिळावी व हॉस्पिटलचा चर्चा मिळावा यासाठी बिरूभाऊ शिंदे, पंकज शिंदे व खुशाल भाऊसोर यांनी प्रयत्न केले.