नांदगाव – नाशिक येथील शनिभक्त उद्योजक शितल भंडारी यांनी सोमवारी नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर येथील श्री शनी महाराज मंदीर संस्थानला पशु पक्षी यांना अन्न पाणी ठेवण्यासाठी ५० अद्यावत उपकरण पाठविले आहेत. सोबतच ४०० किलो धान्यही दिले आहे. कडक उन्हात पशु पक्ष्यांची अबाळ होऊ नये यासाठी त्यांनी हे उपकरण पाठवले. त्यांच्या या उपक्रमामुळे संस्थान परिसरातील पक्ष्यांची एकाच वेळी अन्न व पाण्याची सोय होणार आहे. मंदिर परिसरातील झाडावर ही उपकरणे बसविण्यात येणार असून यामुळे पक्ष्यांचा चिवचिवाट वाढणार आहे. त्यांच्या या दातृत्वामुळे मंदिर परिसरात शोभा वाढणार आहे. संस्थातर्फे त्यांचे आभार मानन्यात आले आहे.