नांदगाव : नांदगाव तालुक्यातील साकोरा व कासारी या वेगवेगळ्या गावात दोन मजूर कामगारांनी घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आर्थिक अडचणीमुळे जीवनाला कंटाळून या आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
कासारी येथील समाधान सुर्यभान ठाकरे (वय ४०) याने दोरीने घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे . तर साकोरा येथील अशोक भाऊलाल सुर्यवंशी (वय ४५ ) यांनी राहत्या घरी छताला दोरी अडकवून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या दोन्ही घटनांची नांदगांव पोलिसात नोंद झाली आहे. या घटनेचा तपास पो. ह .रवींद्र चौधरी व पो. नि. अनिल कातकाडे स. पो. नि. दिपक सुराडकर करीत आहे .