नांदगाव – नांदगांव शहर, मनमाड शहर तसेच नांदगांव तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात वाढत असलेला कोरोणा प्रादुर्भाव वाढत असुन कोरोना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तालुक्यातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आमदार सुहास(आण्णा) कांदे यांचे अध्यक्षतेखाली नांदगांव तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली.
या बैठकीत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी खालील उपाय योजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
१. शहरातील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कातील हाय रिस्क व लोव्ह रिस्क रुग्ण शोधण्यासाठी नगर परिषदेने शिक्षकांची नेमणूक करून तात्काळ सर्वेक्षण करावे व स्वॅब घेण्याची कार्यवाही करण्यासाठी तालुका अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा तसेच ग्रामीण भागात ज्या गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे त्यांचे हाय रिस्क व लोव्ह रिस्क शोधण्यासाठी प्राथमिक शिक्षकांमार्फत सर्वेक्षण करून संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र मार्फत स्वॅब घेण्यात यावे.
२. होम कॉरंटाईन गृह विलगीकरणामध्ये ठेवलेल्या व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी आढळून येणार नाही याबाबत नगरपरिषद व ग्रामपंचायत यांनी काळजी घेणे.
३. सर्व शासकीय कर्मचारी/अधिकारी, सर्व व्यावसायिक, 45 co- morbid व्यक्ती व 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक यांचे लसीकरण करणे.
४.विनामास्क फिरणारे तसेच सोशल डिस्टंन्स चे पालन न करणारे व्यक्ती व आस्थापना यांचे विरुध्द पथक नियुक्त करून कारवाई करणे.
५.जिल्हाधिकारी यांचे कडील आदेशान्वये सकाळी ७.०० व सायंकाळी ७.०० या वेळेचे बंधन सर्वांनी पाळावे.
यावेळी येवला प्रांताधिकारी कासार साहेब, नांदगांव तहसिलदार कुलकर्णी साहेब, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आहेर, नांदगांव वैद्यकीय अधिक्षक डॉ रोहन बोरसे, मनमाड वैद्यकीय अधिक्षक डॉ निरभवणे, नांदगांव मुख्याधिकारी गोसावी साहेब, मनमाड मुख्याधिकारी मुंडे साहेब, नांदगांव तहसिल अव्वल कारकून डूमरे साहेब, नांदगांव नगर परिषद आरोग्य अधिकारी कुटे साहेब, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी वाघ साहेब, सर्व पत्रकार बांधव, तालुक्यातील सर्व तलाठी, सर्व ग्रामसेवक, तसेच सर्व पोलीस पाटील, शिवसेना तालुका प्रमुख किरण देवरे, अमोल नावंदर, युवासेना तालुकाप्रमुख सागर हिरे आदी उपस्थित होते.