नांदगाव – नांदगाव तालुका युवक कॉंग्रेसची आढावा बैठक नाशिक जिल्हा प्रभारी प्रशांत ओगले यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती व सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आर्कि. अश्विनी आहेर, प्रदेश महासचिव कल्याणी रांगोळे,नाशिक शहर युवक काँग्रेस अध्यक्ष स्वप्नील पाटील, नाशिक जिल्हा युवक काँग्रेस प्रभारी योगेश महाजन, नाशिक ग्रामीण अध्यक्ष दिनेश चोथवे, राहुल पाटील,नाना गाडे ,रोहन कातकाडे,आकाश घोलप,अजय खरोटे हे प्रमुख पदाधिकारी उपस्थितीत होते.
आर्कि.अश्विनीताई आहेर व तालुकाध्यक्ष हरेश्वर सुर्वे यांनी कोरोना काळात काँगेस पक्षाने सर्वसामान्य जनतेसाठी केलेल्या कामाचा आढावा सादर केला. यामध्ये त्यांनी सांगितले की, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, वैद्यकीय अधिकारी यांना पीपीई किटचे वाटप, स्थलांतरित लोक जे रस्त्याने पायी गावाकडे निघाले अशा लोकांसाठी अन्नछत्र, निराधार व विधवा महिलांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप व शेतकऱ्यानंसाठी युरिया खताची टंचाई असतांना जिल्हाधिकारी यांच्याकडे युरिया उपलब्ध होण्यासाठी मागणी आम्ही केली. महासचिव प्रशांत ओगले यांनी नांदगाव तालुक्यासह नाशिक शहर व नाशिक ग्रामीण तालुक्यातील पदाधिकारी यांचाही आढावा या बैठकीत घेतला. बैठकीस युवा काँग्रेसचे दर्शन आहेर, भिमशक्ती संघटनेचे मनोज चोपडे, कैलास गायकवाड, नवनाथ बोरसे, योगेश वाघ, विकास पवार, महेश आहेर, भास्कर सोळशे, सुनील पवार, शेषराव घुगे, अँड.अमोल आहेर, वैभव सरोदे, निखिल वाघ, हृषीकेश चव्हाण, सागर जाधव ,प्रवीण घोटेकर,अक्षय कासलीवाल,निरंजन आहेर ,भूषण आहेर,शुभम शिंदे, अजय बनसोडे,आदींसह नांदगाव तालुक्यातील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन कैलास गायकवाड यांनी केले तर आभार योगेश वाघ यांनी मानले.