नांदगाव – पूर्वीची पत्रकारिता ही अत्यंत धावपळीची होती, अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. आज तंत्रज्ञानाच्या विकासामुळे व प्रगतीमुळे पत्रकारिता सहज सोपी झाली आहे. ज्याच्या हाती मोबाईल तो सहज बातमी आता पाठवू लागला आहे. त्यामुळे पत्रकारांची संख्या वाढत आहे. पण आर्थिक दृष्ट्या ते सक्षम होत नसल्याची खंत जेष्ठ पत्रकार संजीव धामणे यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी पत्रकार क्षेत्रात होत असलेले स्थित्यांतरे मांडले.
येथील सावता महाराज कंपाऊंड मध्ये नांदगाव तालुका पत्रकार संघातर्फे आयोजित केलेल्या स्नेह-मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदगाव तालुका अध्यक्ष बब्बुभाई होते. प्रमुख पाहुणे म्हणून दै.जनश्रध्दाचे संपादक नरेश गुजराथी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संजीव निकम हे उपस्थित होते. यावेळी मराठी पत्रकारांचे आद्य दैवत बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांचा गुणगौरव, पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. या मेळा्व्यात ज्येष्ठ पत्रकार संजीव निकम, मारूती जगधने, सुरेश शेळके, प्रा.सुरेश नारायणे, संजय मोरे, बाबासाहेब कदम, शंकर विसपुते आदीनी मते व्यक्त केली.
यावेळी बब्बु शेख यांनी वर्षभरात पत्रकार संघाने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. पत्रकारांना कोरोनाच्या आरोग्य सुरक्षित ठेवुन बातमीदारी करावी असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी नरेश गुजराथी व संजीव निकम यांच्या हस्ते कोरोना या गंभीर आजाराशी सामना केलेल्या बब्बुभाई शेख, संजीव धामणे व संदिप जेजुरकर यांचा विशेष गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे उपस्थितीत पत्रकारांना स्मृती चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मारूती जगधने, सुरेश शेळके, सुरेश नारायणे, प्रणीत आहेर, विलास आहीरे, सतीश पुणतांबेकर, रईस शेख, संदीप देशपांडे, संदीप जेजुरकर,नाना आहिरे, बापु जाधव, बाबा कदम, भगवान हिरे, महंमद शेख, किरण देवरे, छोटु शेळके, सोनज,शंकर विसपुते, विजय भावसार, सतिश शेकदार,संजय मोरे,शैलेश शेळके मगेश सोनज,भारत देवरे,अमिन शेख,बापू जाधव,संदीप जेजुरकर, सुनिल साळवे, धिरज राऊत, सचिन पांडे, चंचल गंगवाल आदी उपस्थित होते.