डॉ रोहन बोरसे यांचा धन्वंतरी या उपाधी ने गौरव
नांदगाव – रुग्ण सेवेत आहोरात्र झटणारे डॉ. रोहन बोरसे यांचा संस्कृती रक्षक केंद्रा तर्फे धन्वंतरी ही पदवी देवून गौरव करण्यात आला. नांदगाव येथील छाजेड़ पेट्रोलियम आयोजित गणेशोत्सव महाआरती प्रसंगी त्यांना धन्वंतरी भगवानाची प्रतिमा  देवून संस्कृती रक्षक केंद्राचे संस्थापक व छाजेड़ पेट्रोलियमचे संचालक दत्तराज छाजेड़ यांनी त्याचा गौरव केला. या  प्रसंगी डॉ.सचिन थेरे,  भाजपच्या जिल्हा परिषद्  सदस्या सौ. आशाताई फकीरराव जगताप,  पंचायत  समिती सदस्य  श्रावण दादा गोरे ,भाजपा जि.चिटणीस स्वप्निल शिंदे,  भालुर शाखा अध्यक्ष विक्रम निकम,पत्रकार संदीप जेजुरकर,सावता परिषद अध्यक्ष कृष्णा त्रिभुवन, संस्कार संस्थेचे अध्यक्ष  राहुल आहिरे  प्रसिद्ध गायक मनोज निकम छाजेड़ पेट्रोलियमचा कर्मचारी वर्ग उपस्थित होते
 
			








