नांदगाव – नांदगाव तालुक्यातील जामधरी येथे गावठी बंदुकीने गोळी झाडून काळवीटची शिकार करणा-या दोन आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे. या आरोपींकडून एक गावठी बंदूक,पाच जिवंत काडतुसे,काळवीटचे मांस व इतर साहित्य जप्त करण्यात आले.आरोपींना कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना १५ दिवसाची कोठडी देण्यात आल्याची माहिती वन विभागाचे निरीक्षक दत्तात्रय बोरसे यांनी दिली. ही घटना घडल्याचे कळताच वन विभागाचे निरीक्षक दत्तात्रय बोरसे, वनपाल तानाजी भुजबळ, कुणाल वंडगे,ए.बी.राठोड,प्रफुल्ल पाटील,अजय वाघ, बाबसाहेब सूर्यवंशी, नाना राठोड, अशोक सोनवणे, राजेंद्र दौड, मार्गेपाड हे घटनास्थळी गेले. येथे दोन आरोपींना रंगेहाथ पकडले. मुद्स्सर अहेमद आणि जाहिद अहेमद (दोघे रा.मालेगाव) अशी या आरोपींची नावे आहेत.