तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम सुरू झाला आहे.ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करताना ग्रामीण भागातील उमेदवारांची दमछाक सध्या सुरू आहे. आणि अशा परिस्थितीत वडाळी बुद्रुक येथील अर्चना सानप यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत महिला राखीव गटातून निवडणूक लढवण्याची तयारी केली,मात्र मतदार यादी अवलोकन केले असता,त्यांचे नाव मात्र शेजारील वडाळी खुर्द गावाच्या मतदार यादीत समाविष्ट केल्याचे आढळून आल्याने शासकीय यंत्रणेतील सावळा गोंधळ समोर आला आहे.
निवडणूक नसलेल्या गावासाठी सहायक निवडणूक अधिकारी नियुक्त केल्याने निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार उदय कुलकर्णी अडचणीत आल्याची घटना ताजी असतानाच हा दुसरा वादग्रस्त प्रसंग घडला आहे. यावर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.