नांदगांव – कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व विविध सेवा देणाऱ्या शासकीय, निमशासकीय व सेवाभावी संस्थेतील व्यक्तींचा नांदगाव पोलीस स्टेशनतर्फे गौरव करण्यात आला. पोलीस निरीक्षक अनिल कातकडे यांच्या हस्ते डॉ. रोहन बोरसे, सुमित सोनवणे, राहुल कुटे, बंडू कायस्थ, सुमित गुप्ता, विक्रांत कवडे, रमणलाल लोढा, नानासाहेब काकळीज, तुषार पांडे,आनंद महिरे, सचिन देवकाते, आबिद सयद, सागर हिरे, प्रसाद वडनेरे, अनिता झेंडे, प्रमिला थेटे, अर्चना जाधव, उमेश चंडाले,संजय मोरे, सुरेश शेळके, संतोष कांदे, आदींचा कोविड योध्दा म्हणून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मत व्यक्त करतांना डॉ. बोरसे यांनी सांगितले की, येथील ग्रामीण रुग्णालयात ३२९ रुग्णांवर उपचार करण्यात आले. तसेच ११२८ रुग्ण विलगीकरण करून उपचार केले. अद्याप कोविडचा धोका संपलेला नाही. सर्वांनी कोविड नियमांचे पालन करून स्वत:ला सुरक्षित ठेवावे. यावेळी नानासाहेब काकळीज, सुमित सोनवणे आदींनी विचार मांडले. सूत्रसंचालन राजेंद्र गांगुर्डे व पंकज देवकाते यांनी केले.