नांदगाव – केंद्र शासनाच्या पोषण अभियान या महत्वाकांक्षी उपक्रमात माहे सप्टेंबर महिना पोषण माह म्हणून साजरा करण्यात येत आहे.एकात्मिक बाल विकास सेवा योजना नांदगाव तालुक्यातील बोलठाण, नागापुर, न्यायडोंगरी, वेहळगाव येथे बिट स्तरीय पोषण अभियान कालावधीतील पोषण माह कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती आर्कि.अश्विनी अनिल आहेर यांनी महिलांना पोषण महाचे महत्व विषद करून सांगितले.
पोषण माह चे महत्व सांगणाऱ्या व बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ या विषयावर मुलींनी रांगोळ्या काढल्या. गरोदर मातेच्या कौतुक सोहळ्याचे आयोजन, ६ महिने पूर्ण झालेल्या बाळांचे अर्धवार्षिक वाढदिवस, तीन वर्ष पूर्ण झालेल्या बालकांचा प्रवेशोत्सव , मुलींच्या जन्माचे स्वागत, सामाजिक लेखा परीक्षण, आहार प्रात्यक्षिक, किशोरवयीन मुलींची HB तपासणी, इ उपक्रम घेण्यात आले..तसेच जि.प. सेस योजनेमधील मधील किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकीन चे मोफत वाटप ,अंगनवाडी केंद्राना वॉटर फिल्टरचे वाटप जि प महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मा आर्कि अश्विनीताई आहेर व पंचायत समिती सदस्य सौ. ख़िरडकर यांच्या हस्ते करण्यात आले.