नांदगाव -पूर्वापार रस्ता असतांनाही काही लोकांनी येथे रस्ताच नसल्याचा कांगावा केल्याने खादगाव येथील दलित,आदिवासी कुटुंबांना तहसील कार्यालयासमोर उपोषण केले. त्यांच्या या आंदोलनाची दखल तहसिलदारांना घेतली व या कुटुंबांना रस्ता मिळाला. ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम संपल्यानंतर त्यांंच्यासाठी हा रस्ता खुला केला जाणार आहे.
या घटनेची पार्श्वभूमी अशी की,तालुक्यातील खादगाव येथील वाल्मिक अहिरे व ग्रामस्थ स्थानिक ग्रामस्थांच्या अन्यायाला कंटाळून नांदगाव तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. खादगाव येथील दलित वस्तीमध्ये जवळपास १२०० च्या आसपास ग्रामस्थ वास्तव्य करून आहेत. महसूल विभागाने केलेल्या चौकशीनुसार सदर दलित ग्रामस्थांना येण्या-जाण्यासाठी जो पूर्वापार रस्ता होता, तो अधिकृत असतांनाही काही लोकांनी अतिक्रमण करून गायब केला. त्या विरोधात दलित ग्रामस्थांनी या विरोधात दंड थोपटत काल पासून आमरण उपोषण सुरु केले होते.
मात्र आज तहसीलदार उदय कुलकर्णी यांनी या उपोषणकर्त्यांची भेट घेऊन सदर मंडळ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पूर्वापार रस्ता असल्याचा अहवाल दिला असून,या ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम संपल्यानंतर सदर रस्ता तुम्हाला खुला करून देण्यात येईल.असे आश्वासन दिल्याने सदर उपोषण सोडण्यात आले.