नांदगाव – जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती आर्की.अश्विनी अनिल आहेर यांच्या प्रयत्नाने पिंपरखेड व परधाडी शिवार रस्ता मंजूर करण्यात आला असून सदर रस्त्याच्या कामाची पाहणी करतानां युवा नेते दर्शन आहेर तसेच पिंपरखेड व परधाडी येथील शेतकरी सतिष गायकवाड, दत्तु पुंड ,सागर बोरसे ,किरण राठोड ,बबन चव्हाण , उपस्थित होते. शिवार रस्त्या बंद असताना पिंपरखेड व परधाडी येथिल शेतकऱ्यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागत होते .शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन हे काम केल्याबद्दल शेतक-यांनी समाधान व्यक्त केले.