नांदगाव : आर्थिक व्यवहाराच्या वादातुन एका महिलेने तालुक्यातील पिंप्राळे येथे आदिवासी वस्तीवर जाऊन ऊसतोड कामगारांच्या पत्नीला अर्धनग्न करुन चप्पलने अमानुषपणे मारहाण केल्यानंतर नांदगाव पोलिस स्थानकात या महिलेविरुध्द गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. मारहाण करणा-या महिलेचे नाव संगिता प्रकाश वाघ असून ती व्दारकानगर नांदगाव येथे राहते. ती ऊसतोड कामगारांची मुकरदम आहे.
या मारहाण प्रकरणी पिंप्राळे शिवार येथील पिंटु गंगाराम सोनवणे यांनी फिर्याद दिली असून मारहाण करणारी महिला नात्याने सख्खी चुलत मावस बहिण असल्याचे म्हटले आहे. आम्ही तिच्याकडून एक वर्षापूर्वी उसनवार पैसै घेतले होते. आम्ही तिच्याकडे कामाला न जाता दुस-या मुकरदमाच्या टोळीत कामाला गेल्यामुळे तीला राग आला. त्यामुळे तिने आम्ही घरी असल्याचे समजतात पत्नी अंबाबाई हिचे केस ओढून चप्पलेने मारहाण केली. तिची साडी सोडण्याचा प्रयत्न करुन लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. मलाही काठीने मारहाण केली. पैसे परत केले नाही तर तुमचा बेत बघते असा दम दिला.
या फिर्यादीवरुन नांदगाव पोलिस स्थानकात भादवि कलम ३५४ (ब), ३२४, ५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल कातकडे करीत आहे,