नांदगाव – ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काम करणाऱ्या यंत्रणेतील ढिसाळ नियोजनाचा फटका दस्तरखुद्द या प्रक्रियेत काम करणाऱ्या घटकांना बसू लागल्याचे प्रत्यन्तर नांदगाव तालुक्यात बघावयास मिळाले आहे. ८० हुन अधिक मतदाराना पोस्टल मतदानापासून वंचित ठेवण्याची किमया नांदगाव तालुक्याच्या निवडणूक शाखेने करून दाखविली आहे. मनुष्यबळ मिळत नसल्याचा बाऊ उभा करून आखण्यात आलेल्या नियोजनात सुसूत्रता नसल्याचा फटका निवडणूक कामी येणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बसला असल्याची चर्चा आहे.
तर दुसरीकडे तालुक्यातील बहुतांशी मतदान केंद्रावर महिला कर्मचारी नियुक्त करताना मुख्यालयापासून दूरवरील अंतरावरच्या मतदान केंद्रावर महिला कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यामुळे निवडणूक शाखेने बजाविलेल्या आदेशात दिसून येत आहे. लहान मुले असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना अशा नियुक्त्या देण्यातला घोळ झाल्याचेही दिसून आले आहे. मुळातच ग्राम पंचायतीच्या निवडणुकांच्या अधिकृत घोषणा होण्यापूर्वी जेऊर येथील साहेबराव घुगे यांनी विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्यांमधून १६४ मतदारांची नवे वगळण्यात आल्याच्या निषेधार्थ तहसील कार्यालयापुढे बेंमुदत उपोषण सुरु केले. मात्र त्यांच्या उपोषणावर कुठलाही मार्ग निघाला नाही. अथवा काढला नाही. परिणामी १६४ मतदार वंचितच राहणार असल्याचं प्रसंग उभा राहिला. घुगे यांनी ऑक्टोबरपासून पाठपुरावा केला होता. हे त्यातील विशेष होय आता तर थेट पोस्टल मतदानापासून निवडणूककामी ८० कर्मचाऱ्यांना वंचित राहावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला.