गृहस्वप्न आणि ग्राहक भान – भाग २
पुणे – साधा भाजीपालाही चारवेळा भावकरुन घेणारे ग्राहक मात्र आपले घर चक्क डोळे मिटून घेतात, असे बोलले जाते. फारसे ज्ञान ग्राहकांना नसल्याने त्याचा फायदा बांधकाम व्यावसायिक घेतात आणि त्याद्वारे अनेकांची फसवणूक होते. घराचे क्षेत्र नक्की किती आहे, याबाबत ग्राहकांना योग्य माहिती मिळत नाही. गेल्या काही वर्षात कार्पेट, बिल्टअप, सुपरबिल्टअप, सुपर फिशिअल अशा विविध प्रकारे घराचे क्षेत्र सांगितले जात आहे. यातून बिल्डर हे नसलेली जागाही ग्राहकाला विकत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे आपले घर नक्की कसे मोजायचे, त्याचे क्षेत्र नक्की किती आहे, याविषयी सांगत आहेत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी विजय सागर.
बघा हा व्हिडिओ