पाटणा (बिहार) – पोलिस महासंचालक हे पद सोडून राजकारणात उतरणाऱ्या गुप्तेश्वर पांडे यांचा मुखभंग झाला आहे. बक्सर विधानसभा मतरादसंघातून इच्छूक असलेल्या पांडे यांच्या पदरी निराशा पडली आहे. बक्सरची उमेदवारी पमेश्वर चतुर्वेदी यांना मिळाली आहे. विशेष म्हणजे, चतुर्वेदी हे पूर्वी शिपाई होते. त्यामुळे माजी शिपाई एका माजी पोलिस महासंचालकाला भारी पडल्याची बिहारमध्ये चर्चा आहे.
२००९ मध्येही पांडे यांनी राजकारणात प्रवेश करण्याचे निश्चित केले होते. त्यावेळीही त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन लोकसभेचे तिकीट मागितले होते. मात्र, त्यांना तिकीट देण्यात आले नाही. तसेच त्यांचा राजीनामाही मंजूर करण्यात आला नव्हता. त्यामुळे त्यांनी नोकरी पुन्हा सुरू केली. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि बक्सरमधून लढण्याची जोरदार तयारी केली. गेल्या महिन्याच्या अखेरीसच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. मात्र, आघाडीच्या जागा वाटपात बक्सरची जागा भाजपकडे गेली. तर पांडे हे जनता दल (युनायटेड) कडून उमेदवारीसाठी इच्छूक होते. भाजपने चतुर्वेदींना तिकीट दिल्याने पांडे यांची स्थिती घर का ना घाटका अशी झाली आहे.
दरम्यान, पांडे यांच्या या अवस्थेबद्दल आणि या सर्व घटनाक्रमाबद्दल सोशल मिडीयात मोठे पडसाद उमटत आहेत. पांडे यांची खिल्ली उडविणाऱ्या पोस्ट आणि मिम्स यांचा पाऊस पडला आहे.
पांडे यांनी केलेले आवाहन