मुंबई – संपूर्ण जगातला एक घटक असा आहे जो सकाळ-संध्याकाळ एकवेळ जेवणाचा विचार करणार नाही, पण शेअर बाजारातील चढाव-उताराचा नक्कीच करतो. बरेचदा काहींचे ब्लड प्रेशरही शेअर बाजारातील परिस्थितीनुसार कमी-जास्त होत असते. नवीन वर्षात तर यावर विशेष लक्ष असणार आहे. त्यामुळे पहिले वर्षभरातील सुट्यांची यादीच लोकांनी करून ठेवलेली आहे.
नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आफ इंडिया आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज वेगवेगळ्या निमित्ताने आणि विशेष दिवसांना बंद राहणार आहे. ज्याप्रमाणे सणावारांना, राष्ट्रीय सणांना इतरांना सुट्या असतात तसेच शेअर बाजारातही काम होत नाही. राष्ट्रीय किंवा राज्य सरकारच्या सुट्यांवर दर वर्षी व्यापाऱ्यांसाठी काही दिवस बाजार बंद असतात. २०२१मध्ये असे कोणते दिवस आहेत जेव्हा शेअर बाजाराला सुट्या असतील. चला त्यावर एक नजर टाकूया
इक्विटी सेगमेंट
प्रजासत्ताक दिन – २६ जानेवारी (मंगळवार)
महाशिवरात्री – ११ मार्च (गुरुवार)
होळी – २९ मार्च (सोमवार)
गुड फ्रायडे – २ एप्रिल (शुक्रवार)
आंबेडकर जयंती – १४ एप्रिल (बुधवार)
राम नवमी – २१ एप्रिल (बुधवार)
रमजान ईद – १३ मे (गुरुवार)
बकरी ईद – २१ जुलै (बुधवार)
मोहरम – १९ आगस्ट (गुरुवार)
गणेश चतुर्थी – १० सप्टेंबर (शुक्रवार)
दसरा – १५ आक्टोबर (शुक्रवार)
दिवाळी – ४ नोव्हेंबर णि ५ नोव्हेंबर (गुरुवार आणि शुक्रवार)
गुरुनानक जयंती – १९ नोव्हेंबर (शुक्रवार)
कमोडिटी सेगमेंट
नवीन वर्षाचा पहिला दिवस – १ जानेवारी (शुक्रवार- सकाळच्या सत्रात सुरू असेल)
महाशिवरात्री – ११ मार्च (गुरुवार – सायंकाळच्या सत्रात सुरू असेल)
होळी – २९ मार्च (सोमवार-सायंकाळच्या सत्रात सुरू असेल)
गुड फ्रायडे – २ एप्रिल (शुक्रवार)
आंबेडकर जयंती – १४ एप्रिल (बुधवार – सायंकाळच्या सत्रात सुरू आहे)
राम नवमी – २१ एप्रिल (बुधवार – सायंकाळच्या सत्रात सुरू असेल)
रमजान ईद – १३ मे (गुरुवार – सायंकाळच्या सत्रात सुरू असेल)
बकरी ईद – २१ जुलै (बुधवार – सायंकाळच्या सत्रात सुरू असेल)
मोहरम – १९ आगस्ट (गुरुवार – सायंकाळच्या सत्रात सुरू असेल)
गणेश चतुर्थी – १० आगस्ट (शुक्रवार – सायंकाळच्या सत्रात सुरू असेल)
दसरा – १५ आक्टोबर (शुक्रवार – सायंकाळच्या सत्रात सुरू असेल)
दिवाळी – ४ नोव्हेंबर आणि ५ नोव्हेंबर (गुरुवार आणि शुक्रवार – सायंकाळच्या सत्रात सुरू असेल.)
गुरुनानक जयंती – १९ नोव्हेंबर (शुक्रवार – सायंकाळी सुरू असेल)