नव्या वर्षात मीन राशीवर शनीचा प्रभाव राहणार असा
२०२१ मध्ये संपूर्ण वर्षभर शनी चंद्राच्या श्रवण नक्षत्र मध्ये असणार आहे. त्यामुळे तो मीन राशीच्या एकादश भावा मध्ये येणार आहे.
मीन राशी असलेल्यांनी ही काळजी घ्या
संपूर्ण वर्षभर मीन राशी असलेल्यांनी आपल्या कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. ज्या कुठल्या क्षेत्रात आपण काम करीत असाल त्या ठिकाणी अधिकाधिक मेहनत करून यशप्राप्ती करावी. जपून सल्ला द्यावा. मित्र व शत्रू हे पारखूनच मदत करावी. अति उदारता आपणास वाईट अनुभव देऊ शकते. ज्या मित्रमंडळींना परिचितांना आपण त्यांच्या संकट समयी मदत केली असेल ते लोक मात्र आपल्याला मदत करतीलच, असे सांगता येत नाही. योग्य ती आर्थिक तरतूद आपण करून ठेवणे गरजेचे आहे. अचानक होणाऱ्या शारीरिक पीडा तसेच अनपेक्षित खर्च यादृष्टीने तयारी असावी. घरातील ज्येष्ठ मंडळींना त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यास सांगावे. लहान मुलांच्या आजाराकडे दुर्लक्ष नको. शैक्षणिक कार्यात विशेष लक्ष द्यावे. वास्तु संबंधी मोठा खर्च संभवतो. रेंगाळलेल्या कामांचा विशेष पाठपुरावा करावा लागेल.
असा होईल लाभ
मीन राशी असलेल्यांनी शनी एकादस भावामध्ये असल्याने बऱ्याच बाबतीत तो विशेष लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामध्ये केलेल्या मेहनतीचे विशेष फळ प्राप्ती होणे. अचानक मोठा धनलाभ. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटमधून देखील बऱ्यापैकी धनप्राप्ती. सर्व क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींची सहज परिचय होईल. या वर्षात आपण ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रातील मोठा नावलौकिक मिळेल. तर काही जणांना या वर्षीच्या प्रगतीमुळे आयुष्यभरासाठी फायदा होण्याची शक्यता आहे.
उद्या पण शनीच्या प्रभावाखालील पुढची रास बघू…..