मुंबई/नाशिक – नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर नाशिक, मुंबईसह राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने रात्रीच्या सुमारास हजेरी लावली आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ हवामान होते. मंगळवारी सकाळी मात्र सूर्यनारायणाचे दर्शन झाले आहे. मात्र, आगामी २४ तासात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
येत्या २४ तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली होती. तर मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील, असा वेधशाळेचा अंदाज होता. रत्नागिरी जिल्ह्यात येत्या ७ जानेवारीपर्यंत विजांच्या गडगडाटासह काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.पुणे, अमरावती, औरंगाबाद, जालना तसंच बीड जिल्ह्यातही ढगाळ वातावरण सोमवारी होते. सिंधुदुर्ग, नवी मुंबईत व रत्नागिरीतही पावसानं हजेरी लावली. त्याता आता नाशिकची भर पडली.
नव्या वर्षात नाशिक, दिंडोरीमध्ये मध्यरात्री मुसळधार अवकाळी पाऊस पडला. याअगोदर नाशिक जिल्ह्यात परवा रात्री पिंपळगाव वाखरी, वडनेर भैरव यासह काही ठिकाणी मध्य रात्री पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी सोमवारी ढगाळ वातावरण होते. पण, दिवसभऱ पाऊस पडला नाही. पण, रात्री पावसाने हजेरी लावली.
दिंडोरीत मध्यरात्री जोरदार पाऊस
गेल्याच महिन्यात बेमोसमी पाऊस व खराब वातावरणामुळे द्राक्ष भाजीपाला वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना महागडे औषधें फवारणी करावी लागली होती आता पुन्हा ढगाळ वातावरण व पाऊस यामुळे शेतीच्या नुकसानीची भीती व्यक्त होत आहे.