नवी दिल्ली – कोरोनाच्या नव्या विषाणूने संपूर्ण जगाला संकटात आणि गोंधळात टाकले आहे. त्यामुळे अनेक देशांनी आपल्या सीमा सील करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना विषाणूच्या या नव्या धोक्याला सामोरे जाण्यासाठी भारतानेही धोरण आखले आहे. तर नव्या कोरोनावर आपली लस प्रभावी ठरू शकते, असा दावा बायोटेक व फायझरने केला आहे.
सध्या लस तयार शकण्यात आलेली लस सहा आठवड्यांत कोरोना विषाणू नायनाट करून टाकते. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. असा दिलासा देत बायोटेकसह, फायझरने असा दावा केला की, सदर लस ही नव्या कोरोना विषाणूचा सामना करण्यास सक्षम आहे. या संदर्भात बायोटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी उगुर साहिन म्हणाले की, कोविड -१९ च्या नवीन आणि वेगवान संसर्गाविरोधात फायझर आणि बायोटेकची लस प्रभावी असेल यावर वैज्ञानिकांना विश्वास आहे.
वास्तविक, कोरोना विषाणूच्या बदललेल्या स्वरूपाबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न उद्भवत आहेत. यातील एक प्रश्न म्हणजे कोरोनाची सध्याची लस ही कोविड -१९ याच्या नव्या स्वरूपाशी लढायला सक्षम आहे की नाही? तथापि, तज्ज्ञांचे मत आहे की, सद्यस्थितीत लस या बदललेल्या रूपात कोरोनाशी लढायला सक्षम आहे. कोरोना व्हायरस लस तयार करणाऱ्या कंपन्या अद्याप त्यांची लस व्हायरस-प्रकाराशी लढा देण्यास सक्षम आहे की नाही ? याबद्दल स्पष्ट उत्तर देऊ शकलेले नाही. परंतु बायोटेक कंपनीचे सह-संस्थापक युगर साहिन म्हणतात की, वैज्ञानिकदृष्ट्या या लसीची प्रतिकारशक्ती देखील व्हायरसच्या या बदललेल्या स्वरूपाचा योग्य सामना करू शकेल, अशी शक्यता आहे.