लंडन – नव्या कोरोनाच्या भीतीमुळे युरोपमधील अनेक देशांनी ब्रिटनमध्ये जाणाऱ्या विमान सेवेवर बंदी घातल्याने
ब्रिटनवर अन्न पदार्थांचा तुटवडा होण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे. स्कॉटलंडने आपली ब्रिटन सीमा बंद करुन प्रवासावर बंदी घातली आहे. त्याचबरोबर फ्रान्सने गेल्या ४८ तासांपासून ब्रिटनकडून सर्व प्रकारच्या रस्ते, रेल्वे, समुद्र आणि हवाई सेवांवर बंदी घातली आहे.
अशी आहे सद्यस्थिती
विमान उड्डाणे बंद
जर्मनीने ६ जानेवारीपर्यंत इंग्लड आणि दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या सर्व आगमनावर बंदी घातली आहे. स्पेन आणि पोर्तुगाल येथे उड्डाणे करण्यास मनाई आहे. माद्रिद व पोलंड आणि हाँगकाँगने देखील यूकेमधून येणाऱ्या सर्व विमान उड्डाणांवर बंदी घातल्या आहेत. भारतानेही ३१ डिसेंबरपर्यंत विमानसेवा रद्द केली आहे.
गंभीर विषयांवर चर्चा
फ्रान्सच्या परिवहन मंत्र्यांनी सांगितले आहे की, दोन्ही देश अनेक सेवा सुरू करण्याची घोषणा करू शकतात. तर इग्लंडच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनी सांगितले की, ‘आम्ही अनेक मुद्द्यांवरून फ्रान्समधील समकक्ष मंत्र्यांशी सतत बोलत असतो. तसेच कोरोनाच्या नव्या संकटात कोणताही व्यापार करार होऊ शकतो का ? असे विचारले असता पटेल म्हणाले की, तोडगा काढण्यासाठी गंभीर विषयांवर सुरू आहेत.
तुर्की सुपरमार्केटमध्ये गोंधळ
फ्रान्सला जाण्यासाठी तयार केलेल्या ट्रकच्या चालकांना कोरोनाची चाचणी करून तेथे पाठवावे, असा पर्याय सुरू आहे. तथापि, या चाचणीच्या निकालास २४ ते ४८ तास लागतात, त्यामुळे ख्रिसमसच्या आधी किती ट्रक पुढे जाण्यास सक्षम असतील हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे ब्रिटनबरोबर प्रवासी व मालाची बंदी आल्यानंतर तुर्कीच्या सुपरमार्केटमध्ये गोंधळ माजला आहे.
ब्रेड आणि भाजीपाला खरेदी
ब्रिटनमध्ये लोक मोठ्या प्रमाणात टॉयलेट रोल, ब्रेड आणि भाजीपाला खरेदी करताना दिसले. मात्र सरकारने अन्नपदार्थाच्या कमतरता पडणार नसल्याचे आश्वासन दिले आहे, परंतु सुपरमार्केटचे प्रतिनिधित्व करणारे टेस्को आणि सॅनसबरी यांनी म्हटले आहे की, निर्बंध कायम राहिल्यास येथील पुरवठा साखळीवर परिणाम होऊ शकतो.