मुंबई – राज्यात नव्या कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिली आहे. ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील ८ प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. या बाधितांमध्ये मुंबईतील ५ तर पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. हे सर्व जण सध्या विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे.
https://twitter.com/rajeshtope11/status/1346080435772690433