मुंबई – होमग्रोन कार मेकर मारुती सुझुकी च्या एन्ट्रीलेव्हल हॅचबॅक कारच्या यादीत मारुती सेलेरियो चांगलीच पॉप्युलर आहे. अलीकडेच कंपनीने या गाडीचे BS6 मॉडेल लॉन्च केले होते. भारतात या गाडीची स्पर्धा Hyundai Grand i10 आणि Tata Tiago सोबत आहे. मिडीया रिपोर्टनुसार कंपनी सेलेरियोच्या न्यू जनरेशन मॉडेलचे लॉन्चिंग यावर्षी एप्रिलपर्यंत करू शकते. यात अपडेटेड डिझाईन्स आणि फिचर्सही सामील असतील.
Maruti Suzuki Celerio च्या अपडेटेड मॉडेलमध्ये अनेक नवे फिचर्स एड केले जातील. हार्टेक्ट प्लॅटफार्मवर हे मॉडेल तयार केले जात आहे. या प्लॅटफॉर्मवर कंपनीने यापुर्वी मारुती सुझुकी एस-प्रेसो तयार केली होती. या प्लॅटफॉर्मचे हेच वैशिष्ट्य आहे की हे अत्यंत हलके आणि मजबूतही असते. त्यामुळे कार हाताळणे अत्यंत सोपे होते. 2021 Maruti Suzuki Celerio च्या इंजिनची आणि पॉवरची चर्चा केली तर यात बीएस६ कम्प्लायंट १.०-लीटर ट्रीपल सिलेंडर के१०बी इंजीन देण्याची शक्यता आहे.
हे इंजीन ६७ बीएचपीच्या मॅक्झीमम पॉवर आणि ९० एलएमचा पीक टॉर्क जनरेट करण्यात पूर्णपणे सक्षम आहे. असाही अंदाज व्यक्त होत आहे की या कारमध्ये वॅगनआरप्रमाणे १.२ लीटर पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. सध्याच्या सेलेरिओ डायमेंशनचा विचार केला तर याची लांबी ३६९५ मिलीमीटर आणि रुंदी १६०० मिलीमीटर आहे.
या कारची उंची १५६० मिलीमीटर असून यात २४२५ मिलीमाटरचा व्हीलबेस मिळतो. या कारमध्ये ड्युअल टोन इंटेरियर आणि युएसबी, ब्ल्यूटुथ तसेच आक्स कॅपेबिलीटीसोबत 2-DIN ऑडियो सिस्टमवाला डॅशबोर्डही मिळत आहे. याशिवाय कीलेस एन्ट्री, स्टॅंडर्ड ड्रायव्हर साईड एअरबॅग्ससोबत फ्रन्ट पॅसेंजर साईड एअरबॅग्सचाही पर्याय मिळतो.