नवी दिल्ली – ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रीमंडळातील मंत्री, दिग्गज नेते आणि नागरिकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा राजपथावर पार पडला. त्यानंतर भारतीय सैन्याच्या पथसंचलन संपन्न झाले. पथसंचलनाची जबाबदारी यावर्षी लेफ्टनंट जनरल विजय कुमार मिश्रा यांच्याकडे असून ते परेड कमांडर यांच्याकडे होती. या समारोहात राफेलचाही सहभाग होता, तर लढाऊ विमानांची चित्तथरारक दृष्य डोळ्याची पारणे फेडणारी होती. कोरोना काळातही हा समारोह उत्साहात साजरा झाला. या सोहळयात वारकरी संतपरंपरा दर्शविणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथाचे दिमाखदार पथ संचलन झाले.