नवी दिल्ली – दिवसागणिक एवढे नवनवीन स्मार्टफोन्स येत असतात की, नक्की कुठला घ्यायचा, हा प्रश्न सतावतो. त्यासाठीच आम्ही तुम्हाला या काही टिप्स देणार आहोत.
फोनची स्क्रीन
फोनच्या स्क्रीनचे दोन प्रकार आहेत, एलसीडी किंवा एमोलेड. यातील एलसीडी स्क्रीन ही जास्त ब्राईट असते. तर एमोलेड स्क्रीन बॅटरी वाचवते. शिवाय रंग यात छान दिसतात. त्यामुळे स्क्रीन निवडताना एमोलेड स्क्रीनच निवडा.
ऑपरेटिंग सिस्टीम
कोणताही फोन खरेदी करताना त्यातील ऑपरेटिंग सिस्टीम लेटेस्ट असायला हवी. सध्या दोन प्रचलित सिस्टीम आहेत, अँड्रॉइड आणि iOS. यातील अँड्रॉइड ही गुगलची तर iOS सिस्टीम ऍप्पलची आहे. अँड्रॉइडचे लेटेस्ट व्हर्जन 11 आहे. पण iOS सिस्टीम वापरायला अधिक सुरक्षित आहे.
प्रोसेसर
प्रोसेसर हा मोबाइलमधील अत्यंत महत्त्वाचा भाग. त्यामुळे फोन घेताना याचा विचार व्हायलाच हवा. बाजारात अनेक कंपन्यांचे प्रोसेसर आहेत. पण या प्रोसेसरची चिप सर्वात महत्त्वाची आहे. तिचा आकार जेवढा लहान तितका तिचा परफॉर्मन्स चांगला असतो. हो चिप नॅनो मीटरमध्ये मोजली जाते. 12, 8, 7, 5 नॅनो मीटर अशा आकारात ती येते. तुम्ही निवडताना 8, किंवा 7 नॅनो मीटरचा फोन निवडा. पण जर तुम्ही महाग फोन घेणार असाल तर 5 नॅ. मी. ची चिप निवडायला हवी.
